बीमा सखी योजने करता पुणे महिला मंडळ व जीवन बीमा निगम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कार्यक्रम

बाणेर : महिलांच्या सबलीकरण आणि आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्या कर्ता केंद्र सरकारच्या वतीने बीमा सखी योजना जाहीर केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महिला मंडळ आणि  जीवन बीमा निगम, सकाळ नगर शाखेच्या संयुक्त विद्यमाने बीमा सखी योजना राबवण्याकरता  कार्यक्रम घेण्यात आले.

आदित्य ब्रीज सोसायटी च्या क्लबहाऊस मध्ये कार्यक्रम घेण्यात आले. ह्या कार्यक्रमात महिला मंडळ च्या वतीने बाणेर बालेवाडी औंध शाखा अध्यक्षा सौ अस्मिता करंदीकर, विजया चांदोरकर, आदित्य ब्रीज च्या सौ. अश्विनी मुदये व सकाळनगर शाखेतील डी ओ दिग्विजय सुतार, प्रशासकीय अधिकारी सौ मुंशी, सौ. खानविलकर, सौ. जोशी उपस्थित होत्या. 


दिग्विजय सुतार यांनी बीमा सखी योजनेची माहिती दिली. या उपक्रमामध्ये 20 गुण अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.

See also  गुरुवारी बाणेर पांडुरंग देवालय येथे आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन