औंध : हिमाचल प्रदेश (बिलासपूर ) येथे पार पडलेल्या भारत केसरी 2025 कुस्ती स्पर्धेमध्ये औंध कुस्ती केंद्रातील मल्ल विराज रानवडे याने कुमारभारत केसरी हा किताब पटकविला. विराज रानवडे हा औंध कुस्ती केंद्र मध्ये वस्ताद विकास रानवडे यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहे. पैलवान विराज रानवडे याने या आधी देखील राष्ट्रीय पातळीवर अनेक किताब पटकविले आहेत यामध्ये खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने सिल्वर मेडल मिळवले होते तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये देखील त्याने सिल्वर मेडल व गोल्ड मेडल, पुणे महापौर केसरी किताब तसेच अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करत अनेक गदा व पदके मिळवली आहेत.
पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या औंध सारख्या ठिकाणी औंध तालीम ही एक पेशवेकालीन जुनी तालीम असून वस्ताद विकास रानवडे या ठिकाणी पैलवानांकडून सराव करून घेत असतात तालमीत एकूण 70 मुले व मुली सराव करत असून अनेक मल्ल राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत.
विराज हा सलग तीन वर्षे ऑलइंडिया युनिव्हर्सिटी ,भोजपुरी केसरी , इंटर नॅशनल कुस्ती दंगल[इंदोर] या स्पर्धांमध्ये खेळून पुणे जिल्ह्याला अनेक वेळा मेडल मिळवून दिली आहेत.
विराज रानवडे सारखे राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कारवाई करणारे मल्ल औंध तालीम संघामध्ये सराव करत असल्यामुळे इतर मल्ल देखील त्याच्या मागोमाग राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत.