हडपसर : अन्नपूर्णा युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा संचलित
सौ.प्रतिभाताई पवार प्राथमिक विद्यालय वलवा वस्ती वडकी, पुणे
यांच्यामार्फत महापुरामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटणे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी शैक्षणिक साहित्याची मदत शाळेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव रंजीत आकाराम, सामाजिक कार्यकर्ते – श्री तानाजी मोडक, संतोष सावंत, सहदेव वाळुंजकर, बिबीशन पोटरे,श्री गवांडे सुधीर शिवाजी, श्रीमती गायकवाड सुचिता मधुकर, श्री तांदळे केशव एकनाथ, श्रीमती दिवेकर रूपाली संपत, श्रीमती लोंढे सुषमा सुभाष, श्री.काकडे विकास गुलाब सदर आदी उपस्थित होते.
यावेळी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पेन्सिल वॉटर बॉटल, स्कूल बॅग आदी साहित्य पाठवण्यात आले.