21 ते 26 एप्रिल दरम्यान पुण्यात रंगणार रोलबॉलची अंतरराष्ट्रीय स्पर्धा –
मानचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील व क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे :   पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे 21 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान रोलबॉल ची अंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत ह्या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्पर्धेचे प्रमुख पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्रीडा मंत्री गिरीष महाजन, रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष ऍड.अमोल काजळे पाटील,मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग आणि चंदन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री महोदयांना स्पर्धेच्या उदघाट्न व समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले तसेच स्पर्धेला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन ही दिले.आत्तापर्यंत ह्या स्पर्धेसाठी 32 देशांनी सहभाग नोंदविला असून त्यांची व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे राजू दाभाडे व संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
ह्या स्पर्धेसाठी क्रीडानगरी  मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

See also  मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या-माजी आमदार मोहन जोशी