डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून सोमेश्वरवाडी येथील तालीम संघाच्या उभारणीसाठी 51 हजार रुपयांची देणगी

बाणेर : डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट तालीम, सोमेश्वरवाडी पाषाण पुणे येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी  51 हजार रुपये देणगी देण्यात आली.

यावेळी ह. भ. प. सोनबा उमाजी काकडे, ह भ प बळवंत तुकाराम निम्हण, ह. भ. प. शंकर जयसिंग घोलप, ह. भ. प. पांडुरंग शंकर जाधव, श्री भरत जोरे, श्री. संतोष आरगडे, अविनाश गायकवाड, जीवन खेडेकर, ज्ञानेश्वर थोरात, ऋषी कांबळे, अशितोष पाटील, कुणाल कुंजीर आदि उपस्थित होते.

सोमेश्वर वाडी येथील तालमीचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या निमित्ताने सोमेश्वर वाडी परिसरातील युवकांना याचा फायदा होणार असून ग्रामस्थांच्या सामाजिक कार्याला यावेळी हातभार लावण्यात आला.

See also  शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा; शिवसेना पुणे जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न