शेवाळवाडीत ग्रंथालय व प्रयोगशाळेचे उद्घाटन; १६५ शाळांच्या अनुदानाबाबत पाठपुरावा करणार – रामदास आठवले

पुणे : अन्नपूर्णा युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा संचलित खासदार रामदास आठवले माध्यमिक विद्यालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रंथालय व प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले  Ramdas Athawale यांच्या हस्ते शेवाळवाडी येथे संपन्न झाले.

यावेळी बोलताना आठवले यांनी महाराष्ट्रातील १६५ शाळांचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शिक्षण क्षेत्रातील सुविधा वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक श्री रामराजे मोराळे, शिक्षिका सौ. सुषमा लोंढे आणि स्टाफ सदस्य श्री सुनील कावळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ध्येय प्रकाशन अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय “विनर ऑफ द इयर” स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या कु. आसावरी सुनील वरळे आणि पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. रिद्धी बिभीषण पोटरे यांचा Trupti Desai यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानजीभाई ठक्कर होते. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, संस्थाचालक श्रीकांत मोरे, दिलीप लोंढे, नगरसेवक दादा कोद्रे, हिमाली जाधव, कांबळे संतोष सरोदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

See also  औंध येथील रोहन निलय1 सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन