योगातून निरोगी जीवनाचा संदेश: भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. योगतज्ज्ञ डॉ. अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात अध्यापक, शिक्षकेतर व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमातून संस्थेची सर्वांगीण आरोग्य व कल्याणाबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. व्यक्तिमत्त्व विकास तसेच व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी आवश्यक असलेली स्थिरता, सहनशीलता आणि विचारांची स्पष्टता योगातून प्राप्त होते.”

या कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे उपस्थिती होत्या. कार्यक्रमाचे समन्वयन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गौरी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा नियमित अंगीकार करण्याची तसेच निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली.

See also  अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील