औंध : औंध सोशल फाउंडेशनच्या कार्यालयातील श्री गणरायाची आरती प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी चिमटे आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी नगरसेविका भक्ती गायकवाड, औंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्यासह औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच द औंध सोशल फाउंडेशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश आरतीनंतर उपस्थितांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
















