पुणे : राज्यात दर वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत व इतर बहुजन कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अजून पर्यंत या शिष्यवृत्तीची जाहिरात आलेली नव्हती. सदर योजनेची अर्ज प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरु करावी. या मागणी साठी मागणीसाठी 8 मे रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस (शिष्यवृत्ती) सुयश राऊत यांच्या मार्फत राज्याचे समाज कल्याण आयुक्त, इतर बहुजन कल्याण विभागाचे संचालक व समाज कल्याण केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले साहेब, यांना निवेदन देण्यात आले होते.
बहुजन कल्याण विभागाकडून दिनांक १३ मे, २०२३ पासून या शिष्यवृत्ती ची प्रक्रिया सुरु करण्यात आली असुन राज्यातील OBC, VJNT आणि SBC च्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
समाजकल्याण विभागामार्फत अजुन हि प्रक्रिया सुरू करण्यात आली नसून SC चे विद्यार्थी अजून अर्ज करू शकत नाहीत. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर OPEN कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीची प्रक्रिया देखील अजुन सुरू नसून या संदर्भात आम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचलक यांना लवकरच भेटणार आहोत असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले.
बहुजन कल्याण विभागाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थीचे पुणे शहर अध्यक्ष विक्रम जाधव, यश साळुंखे, अजय पवार, ऋषिकेश कडू, जय जगदीश कोंढाळकर, श्रीकांत बालघरे, कार्तिक थोपटे, पार्थ मिटकरी व पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.