उरावडे जळीतकांड दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जेष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते मुळशी तालुक्यातील अग्निशामक केंद्राचे भूमिपूजन

पौड : मुळशीत पिरंगुट परिसरात कासारआंबोली येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन आज गतवर्षी उरावडे येथील एस.व्हि.एस.अॅक्वा रासायनिक कंपनी जळीत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यासाठी युवासेनेचे आविनाश बलकवडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे.

मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण असल्याने अनेक मोठ्या कंपन्या आहेत.त्यामुळे तालुक्यात स्वतंत्र अग्निशमन केंद्र व्हावे अशी मागणी अनेक दिवसापासून होत होती.गतवर्षी उरावडे येथील एस.व्हि.एस अॅक्वा रासायनिक कंपनीमध्ये आग लागून १५ महिला, ३ पुरुष असा १८ कामगारांचा मृत्यू झाला होता.तसेच काही दिवसांपूर्वी पिरंगुट (लवळे फाटा) येथे सुजानील केमो इंडस्ट्रीजला भीषण आग लागली होती. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.पिरंगुट औद्योगिक पट्यात एकही अग्निशमन केंद्र नसल्याने अग्निशमन केंद्राची तातडीची मागणी होत होती.युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांनी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कासारआंबोली येथील एक एकर जमीन आरक्षित करून घेतली तसेच जिल्हाधिकारी यांनी संबंधित जमिनीचा आगाऊ ताबा पीएमआरडीए दिला. त्यानंतर आराखडा तयार करून पीएमआरडीएचे आयुक्त यांनी या केंद्राच्या उभारणीस १२ कोटी ४० लाख खर्चास प्रशासकीय मान्यता दिली.यानंतर सदर बांधकामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे.संबंधित कंत्राटदार यांना वर्क ऑर्डर दिली असून आज या केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले.या केंद्रास हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी जेष्ठ शिवसैनिक गणपत वाशिवले, नामदेव भिलारे, नामदेव टेमघरे, अर्जुन पाठारे, दिलीप गुरव,माणिक शिंदे यांनी केली.

याप्रसंगी उरावडे येथील एस.व्हि.एस अॅक्वा कंपनी जळीत दुर्घटनेतील मृतांचे सर्व नातेवाईक,युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे,महिला सहसंपर्क प्रमुख स्वाती ढमाले, तालुका प्रमुख सचिन खैरे,ज्ञानेश्वर डफळ,कैलास मारणे,दत्ता झोरे,जेष्ठ शिवसैनिक नामदेव भिलारे, नामदेव टेमघरे,गणपत वाशिवले,दिलीप गुरव,अर्जुन पाठारे,हनुमंत सुर्वे, वैभव पवळे,शिवाजी भिलारे,अमित कुडले, विष्णू ढोरे, विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,प्रसिद्धी प्रमुख शंकर शेलार,नितीन साठे,दत्ता पाठारे, शंकर सुतार, छाया भिलारे, पूजा सुतार, प्रदीप सुतार, पंकज धिडे, संजय साठे,मुकेश लोयरे,यश पिंगळे,मयूर रानवडे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

See also  काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना ९ साल,९ सवाल पुस्तिकेचे विमोचन