कचरा प्रकल्प हटवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा निषेध; बाणेर सुसरोड,भांडे नगर येथील नागरिकांची मागणी

बाणेर : बाणेर येथील सुसरोड,भांडे नगर (मोरया नगरी) परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याने पुणे महानगरपालिकाचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी परिसरातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करत परिसरातून कचरा प्रकल्प हटवण्याची मागणी केली.

या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्य रस्त्यावर असलेल्या या कचरा प्रकल्पामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. याबाबत नागरिकांनी न्यायालयात देखील लढा दिला होता. पुणे महानगरपालिका या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून सर्वच राज्यकीय पक्ष देखील त्यांच्या सोयीचे राजकारण करत असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना देखील गेले सात वर्षापासून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. तर दुर्गंधीमुळे शाळेत बस स्टॉप वर देखील थांबता येत नाही तसेच सोसायटीच्या आवारात देखील खेळताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो अशा तक्रारी लहान मुलांनी केल्या.

या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

See also  अयोद्धेवरून आलेल्या श्रीराम अक्षताचे हर्ष उल्हासात स्वागत