आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे शहरातील मानाच्या गणपतीची आरती करत दर्शन घेतले.

पुण्यातील कसबा गणपती, अखिल मंडई गणपती, दगडूशेठ गणपती, साखळीपीर तालीम गणपती, गुरुजी तालीम मंडळ, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती, कडबेआळी तालीम, लक्ष्मी रोडचा राजा आदी पुण्यातील अनेक महत्त्वाच्या मंडळांना आमदार रोहित पवार यांनी भेटी दिल्या व दर्शन घेतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

See also  ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा सुनील माने यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन