बाणेर : नवरात्री निमित्त महानवमीचे औचित्य साधून बाणेर गावातील शिवभक्तांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकावर महिलांच्या हस्ते शिवरायांच्या आरतीने व भगवा ध्वज महिलांच्या हाती देऊन दुर्गादौडीला प्रारंभ करत खऱ्या अर्थाने स्त्रिशक्तीचा जागर करण्यात आला.
बाणेर गावातील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली,अनेक ठिकाणी दौडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.आपल्या राष्ट्राप्रती लोकजागृती करत, छत्रपतींच्या मावळ्यांसारखे जाज्वल्य राष्ट्रप्रेम तरुणांच्या अंगी यावे, आपली संस्कृती जपली जावी, यानिमित्ताने तरुणांचे एकत्रीकरण करुन सामाजिक संदेश देता यावा या उद्देशाने ही दुर्गा दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, तरुणांचा आणि विशेष करुन महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
श्री दुर्गा माता दौडची सुरुवात आणि सांगता बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर करण्यात आली.