वसुबारस च्या पार्श्वभूमीवर गाईच्या पोटातून 55 किलो प्लास्टिक काढले

औंध : जगदंब गोसंवर्धन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मार्केट यार्ड भागातील बेवासर गाई वर उपचार करून सुमारे 55 किलो प्लास्टिक पिशव्या काढण्यात आल्या.

ही गाई 5 दिवसा पूर्वी जगदंब गोसंवर्धन ट्रस्ट मध्ये आली होती .गाई आल्या नंतर कळले की तिच्या पोटात खूप प्लास्टिक आहे. त्यामुळे तिला काही खाणे पण शक्य नव्हतं पोटात जागाच राहिली नव्हती .तीचे ऑपरेशन करून तिच्या पोटातून सुमारे 55 किलो प्लास्टिक आणि 250 ग्राम लोखंडाचा चुरा 2 रुपयाचे 2 कोईन ,1 रुपयाचे 3 कोईन ,1 सेल काढले.
या उपचारासाठी औध पशुवाद्यकीय दवाखान्यातील डॉ शेरेपाटील श्री रमेश दादा गायकवाड जगदंब गोसंवर्धन ट्रस्ट स्थापक अध्यक्ष श्री योगेश आप्पा तुपे गोसेवक अनिल भाऊ जोरी ,अविनाश भाऊ ठाकर, महेश गोरखे ,प्रतीक महामुनी , कलिम शेख ,अशोक मराठे ,शुभम मुळुक, हरी किंडरे याचे विशेष सहकार्य लाभले. जगदंब गोसंवर्धन ट्रस्ट हे गेले 15 वर्ष झाले पुणे शहरातील मोकाट आणि अनाथ गाईच्या सेवा काम करती आहे.

योगेश तुपे म्हणाले, वसुबारसच्या पार्श्वभूमीवर गाईला जीवदान मिळाले. एक दिवस गाईची पूजा न करता वर्ष भर तिच्या कडे लक्ष दिले पाहिजे. आणि आपल्याला करणे शक्य नसेल तर सेवा भावी संस्थाना मदत करा म्हणजे त्याच्या कामाला बळकटी मिळेल व गाईला जीवदान देता येईल.

See also  टापरेवाडी भोर येथे गुळ महोत्सवाच्या आयोजन, शेतकऱ्यांना गूळ बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहता येणार