युवाशक्ती संघटना स्वच्छता-वीर सन्मान सोहळ्याचे आयोजन

औंध : युवाशक्तीच्या वतीने प्रत्येक वर्षी २० डिसेंबर – राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभागातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्र. ८ औंध-बाणेर या परिसरातील ६५ कर्मचाऱ्यांना ते करत असलेल्या देशसेवेबद्दल त्यांचा करण्यात गौरव आला.

कार्यक्रमाला पुणे मनपा औंध वॉर्डचे डी. एस. आय कांबळे साहेब तसेच औंधरोड शेवाळे कोठी सॅनिटरी इन्स्पेक्टर जाधव साहेब, माजी सनदी अधिकारी पंबाजराव वानखेडे सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

युवाशक्तीचे अध्यक्ष अ‍ॅड. रोहित आगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वच्छता कर्मचारी हे सर्वोच्च देशसेवा करत असून शासन आणि समाज म्हणून आपण त्यांची दखल घेत नाही. शासन त्यांना सुख-सुविधा पुरावण्यामध्ये दिरंगाई करत असून त्यांना सर्व सुविधांचा योग्य लाभ वेळेत मिळायला हवा तसेच

समाज म्हणून आपण त्यांची दखल घेऊन योग्य सन्मान करणे गरजेचे आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सन्मान सोहळा आयोजित केल्या बद्दल संघटनेचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील ओव्हाळ यांनी केले आभार प्रदर्शन प्राची गायकवाड यांनी मानले.

See also  मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलतींत भरीव वाढ करावी, आरक्षणाची कायदेशीर लढाई तडीस न्यावी - आमदार सिद्धार्थ शिरोळे