मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे-उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित स्वच्छता विषयक कार्यशाळेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे, असे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्वपूर्ण असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्रीमती तांबे यांनी केले. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मतनोंदणी आणि मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

See also  पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन