मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित  Career Opportunities in Sociology in Reference to NEP 2020 या एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत प्रा डॉ सलमा अझिज ,आबेदा इनामदार कॉलेज आणि प्रशांत आपटे ,समाजशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी मार्गदर्शन केले,सुत्रसंचलन आभार व आयोजन  प्रा पूजा यादव ,प्रा प्रियांका हावलेआणि प्रतिभा पवार  आणि ,डॉ मेघा देशपांडे यांनी तसेच समाजशास्त्र विभागाने वनराई व वृद्धाश्रम आंबी येथे शैक्षणिक भेटी दिल्या ,या भेटीच्या दरम्यान वनराई चे सचिव श्री अमित वाडेकर आणि जनसेवा फाउंडेशनचे  प्रा. डॉ. लावणी आणि डॉ. विनोद शहा यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी 124 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला .
या सर्व उपक्रमांचे संयोजन उपप्राचार्य आणि समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती गगनग्रास यांनी केले  आणि प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मार्गदर्शन केले.

See also  भाजपचा कार्यकाळ पुण्याच्या पर्यावरणासाठी घातकी - डॉ. विश्वंभर चौधरी