औंध : औंध येथील परिहार चौक जवळील शिवदत्त भाजी मंडई मधील गाळेधारकांनी परिहार चौकामध्ये आंदोलन करत गाळ्यांना विरोध करणाऱ्या राजकीय पुढार्यांचा निषेध व्यक्त केला.
पुणे पेठ औंध परिहार चौका पासून 15 मीटर जागा सोडून गेली ३० वर्षापासून व्यवसाय करीत असलेल्या 30 व्यावसायिकांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यास पुणे महापालिका ठराव क्र.०६/३११ दिनांक ०७/०८/२०२३ रोजी मान्यता प्राप्त झाली आहे. शिवदत्त मिनी मार्केटचे प्रतिनिधी गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुराठा करत होते. त्या पाठ-पुरवठ्याला पूर्ण यश आले आहे. परंतु हे काम करत असताना काही राजकीय प्रतिनिधी कडून स्वतःच्या स्वार्थापोटी विरोध होत आहे असा आरोप गाळेधारकांनी केला आहे.
त्या विरोधामध्ये काही चुकीच्या बाबी जनते समोर ठेवण्यात आल्या. मुळात (नो हॉकर्स ) झोन हा परिहार चौक ते बाणेर फाटा (सानेवाडी) हा आहे. आणि आमचे शिवदत्त मिनी मार्केट रा.ग. गायकवाड मार्ग या रस्त्यावर आहे. मान्यता मिळवण्या अगोदर आम्ही गेले कित्येक वर्ष आमच्या समोरील फूटपाथ दुरुस्ती करीता अर्ज करीत होतो. परंतु राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे गेले ५ ते ७ वर्ष इथे फुटपाथ खोदून व्यवसायास जाणूनबुजून अडथळा आणला गेला. त्यामुळे खूप मोठे नुकसान आम्हा गाळाधारकांना झाले. कोविड महामारी मध्ये सुद्धा आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीसुद्धा आम्ही गाळेधारकांनी पुणे महानगरपालिका मालमत्ता व्यवस्थापक या विभागाला दिरंगाई न करता सन २०२३ पर्यंत पूर्ण म.न.पा.चे सर्व भू-भाडे रीतसर भरत आलो आहोत व आम्ही कायदेशीर गाळे धारक आहोत. रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आम्ही आमचे गाळे(स्टॉल) काढले आहेत आजही त्या ठिकाणी गाळे (स्टॉल) होते. केवळ अतिक्रमण विभाग कडून आम्हा सर्व गाळे धारकांना प्रमाणपत्र (लायसन्स) देऊन व्यवसायास रीतसर परवानगी दिली आहे म्हणून आम्ही आमचे गाळे (स्टॉल) काढण्यास परवानगी दिली. अतिक्रमण विभागाचे सुद्धा रीतसर भाडे आम्ही भरले आहेत. पुणे वाहतूक विभागाकडून अनुकूल प्रस्ताव पूर्वनिश्चित प्राप्त झालेला आहे.
मिनी मार्केट मध्ये येणा-या ग्राहकांसाठी सुधारित आराखड्या मध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे असे पत्र स्मार्ट सीटीला कळविले आहे. पालिका आयुक्तांची मान्यता असतांना सुद्धा राजकीय पुढार्यांचा मानसिक त्रास खूप होत आहे. यावेळी शिवदत्त मिनी मार्केट व सर्व सभासद उपस्थित होते.