मोदींचा हा नैतिक पराभव – पृथ्वीराज चव्हाण

कराड : 2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा स्वतःला मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात प्रचार केल्याने भाजपला बहुमत मिळाले नसल्याने हा मोदींचा नैतिक पराभव असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

यावेळी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काँग्रेस पक्षाने जनतेचे मुद्दे घेऊन प्रचार केला तर मोदींनी जाती धर्माचे राजकारण केले, कोणतेही विकासाचे मुद्दे न घेता द्वेषपूर्ण प्रचार करीत देशातील वातावरण बिघडविण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. देशातील पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी प्रचारातच स्वतःच्या नावाने प्रचार केला, काही निवडणुकीत तर देवाचा अवतार असून आईच्या पोटी जन्म न घेता माझा थेट पृथ्वीवर जन्म झाले असल्याचे हास्यास्पद विधान केले होते. मोदींचे ध्रुवीकरणाचे राजकारण जनतेने नाकारले आहे.

महाराष्ट्रात अत्यंत अपेक्षितच निकाल लागला असून भाजप च्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने जागा दाखवली आहे.

सातारा च्या निकालाबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा लोकसभेचा निकाल अत्यंत धक्कादायक निकाल आहे. सातारा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगला प्रचार केला गेला होता. एकजुटीने सर्वांनी प्रचार करूनही झालेला पराभव धक्कादायक आहे.

See also  लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचा भव्य पदग्रहण व शपथविधी समारंभ संपन्न: