पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार रविंद्र धंगेकरांना असमान दाखवले. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 123038 मतांनी विजयी झाले आहेत. मोहोळ यांना एकूण 5 लाख 49 हजार 21 मते मिळाली असून रविंद्र धंगेकरांना 4 लाख 36 हजार 379 मताधिक्य मिळालंय. तसेच वंचितचे वसंत मोरे यांच्या पदरात अवघे 30 हजार 914 मते पडली आहेत. या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं अखेर मोहोळ यांनी विजय मिळवला.
लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी पुणेकरांचे आभार मानत असून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असून मला कोणावरही टीका करायची नाही काही जणांनी कोथरूडमध्ये लीड घेईल, अशी वर्गणी केली मात्र, मी कसब्यातच लीड घेतला. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, हे मी माझ्या अनुभवावरून सांगत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.