जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वसुंधरा अभियानच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हस्ते वृक्षारोपण

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष श्री. जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या वतीने  खा. सुप्रिया सुळे आणि माजी राज्यसभा खासदार वंदना  चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तृतीपंथीय बांधवांच्या शुभहस्ते वृक्षारोपण अभियान पार पडले.

यावेळी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रेशन कीटचे वाटपही करण्यात आले.या अभियानात बाणेर आणि परिसरात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी गिरीश गुरनानी (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा), सचिन यादव (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी क्रीडा सेल पुणे शहर), सारंगजी कोळेकर, पंकजजी खताने व वसुंधरा अभियानचे सर्व सदस्य आणि तसेच सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले होते.

तूकाई टेकडी बाणेर, या ठिकाणी 2006 पासून ,वसुंधरा अभियान बाणेर, संस्था काम करत असून, आत्तापर्यंत संस्थेने ४६००० झाडे लावली आहेत.महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन संस्थेला सन्मानित केले आहे.या अनोख्या प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे नागरिकांतून कौतुक होत आहे.

See also  मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस