पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काय अनुभव आला खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले

पुणे : पिंपरी चिंचवड येथील विजय संकल्प मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आलेला अनुभव नागरिकांसमोर मांडत पालकमंत्री अजित पवार यांच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले, आज पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मला लोकशाहीतीलएक वेगळा अनुभव आला. जेव्हा पालकमंत्री सभागृहात आले तेव्हा पालकमंत्री पदी बसलेली व्यक्ती कोण आहे, त्यांचं आपलं राजकीय, कौटुंबिक नातं काय किंवा ज्येष्ठत्व काय याचा लवलेशही न ठेवता आदरणीय पवारसाहेबांसह प्रत्येकजण खुर्चीवरून उठून उभा राहिला. हा त्या पदाला दिलेला सन्मान. राजकीय जीवनातील प्रत्येकासाठी हा वस्तुपाठ आहे. हीच यशवंतराव चव्हाणसाहेबांची शिकवण आहे आणि हेच आपल्या संघटनेचे संस्कार आहेत.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार यांनी तालुका निहाय निधी वाटपाबाबत प्रश्न विचारला तर पालकमंत्री म्हणतात “निमंत्रित आमदारांना खासदारांना निधीबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.” याबाबत अभ्यास केल्यानंतर समजले की आमंत्रित खासदारांना मतदानाचा अधिकार नाही. परंतु प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो आम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार नाहीत का? दडपशाही नाही का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

See also  राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न- राज्यपाल रमेश बैस