पालिकेने पे अँड पार्क आणल्यास राज्य सरकार आणि पालिकेची अंत्ययात्रा काढणार आप चा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पे अँण्ड पार्कचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.पुणे शहरातील पाच प्रमुख रस्त्यावर पार्किंग शुल्क पुणे महानगरपालिका आकारण्याची तयारी केली आहे. यामध्ये जंगली महाराज रोड, बालेवाडी हायस्ट्रीट रोड, विमाननगर रस्ता, फर्ग्यूसन रोड, नॉर्थ मेन रोड या पाच रस्त्यांचा समावेश आहे.

नागरिक सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून मोठा टॅक्स देत असते. त्या बदल्यात नागरिकांना विविध सुख सोयी देणं हे सरकारचं काम आहे. आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक हनुमंनाच्या शेपटी सारखी लांबच लांब चाललेली आहे. आता सध्या नागरिकांवर सरकारी राज आहे. पुणे महानगरपालिकेने जो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचा आम आदमी पार्टी पुणे शहराच्या वतीने या प्रस्तावाचा जाहीर निषेध करणार आहे. पुणे महानगरपालिकेने पुणेकरांना पार्किंगसाठी जागा राखीव ठेवूने अपेक्षित आहे. महागाईने त्रस्त झालेली नागरिक गॅस सिलेंडर, पेट्रोल,डिझेल, डाळी अशांचे भाव गगनाला भिडलेत परंतु अनेक ठिकाणी नागरिकांना चालायला फुटपाथ नसून त्यावरती अतिक्रमण वाढताना दिसतंय पुणेकरांच्या डोक्यावरती आधीच टॅक्सचा बोजा मोठ्या प्रमाणात आहे.

पालिकेने पे अँड पार्क आणल्यास निषेध म्हणून पुणे पालिका ते स्मशानभूमी राज्य सरकारची आणि पालिकेची अंतयात्रा काढण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी दिला आहे.

See also  अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे