पालकमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण; प्रशासनाला हाताशी धरून पुण्याचे बीड करण्याचा प्रयत्न होतोय का चौकशीची मागणी

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.  या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आज एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळते. जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती, चापट मारत उचलून आदळले.

या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे. जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली आहे. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार करण्यात आला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.  याबाबत पोलीस तक्रार देण्यात आलेले आहेत. या प्रकरणांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे देखील सखोल चौकशी करण्यात यावी तसेच हे काम कायदेशीर प्रक्रियेतून होत आहे का याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

See also  आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा, लढवय्या धनगर समाजाने 'ओबीसी'चे नेतृत्व करावे - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन; सकल धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन