मुख्यमंत्री महोदय हाच आहे का निःपक्षपाती पणा…. कोथरूड मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचे बॅनर

कोथरूड : मंत्रीसाहेब सत्तेचा ऐवढा माज बरा नव्हे… असे निषेधाचे बॅनर कोथरूड मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने लावून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या फक्त निषेध व्यक्त करण्यात आला.
मंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमा मध्ये असे वक्तव्य केले की, सरकारचा कोणता ही निधी हा फक्त्त महायुतीच्या कार्यकर्त्याला मिळेल. महाविकास आघाडीच्या कुठल्या ही कार्यकर्त्याला किंवा सरपंचला निधी मिळणार नाही. विकास होणार नाही. विकास करायचा असेल तर त्यांनी भजपा मध्ये प्रवेश करावा.माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय त्यामुळे मला काही फरक पडत नाही….

राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने कोथरूड मध्ये ठिकठिकाणी फलक लावून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. या वेळी गिरीश गुरनानी म्हणाले सत्ता येते जाते पण सत्तेचा ऐवढा माज कधी कोणी केला नाही. एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या वयक्तिक कामासाठी मंत्र्यांना निधी मागत नाही तो आपल्या गावाच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो. असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाला नाही पण आज एक जबाबदार मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो हे निंदनीय आहे.

मुख्यमंत्री महोदय हाच आहे का तुमचा निपक्षपातीपणा? असा प्रश्न देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शरद पवार पक्षाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावेळी विचाराण्यात आला.

See also  गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा; मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा - मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन