पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे सल्लागार राहुल सोलापूरकर यांच्यासह कोरटकर व कराड यांच्या प्रतिमांचे होळीमध्ये दहन; बालेवाडीत वाईट प्रवृत्तींचे होळीत दहन

बालेवाडी : बालेवाडी येथे भूमाता कृषी मंचच्या वतीने वाईट प्रवृत्तींची होळी करण्यात आली यात पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे सल्लागार राहुल सोलापूरकर, बीड येथील संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड , छत्रपती शिवरायांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर  यांच्या प्रतिमेचे  होळीच्या अग्नीत दहन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर, हरिभक्त परायण संजय बापू वालवडकर, श्री रवी घाटे, राजेश चव्हाण, संदीप बालवडकर, मारुती रानवडे व श्री शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बालेवाडी येथे यंदाच्या होळीमध्ये वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी वाईट प्रवृत्तीच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या तसेच राहुल सोलापूरकर, वाल्मीक कराड प्रशांत कोरटकर यांच्या बॅनर चे दहन होळीमध्ये करण्यात आले.

See also  मुलींना मोफत शिक्षण ही चंद्रकांत पाटील यांची घोषणा चुनावी जुमला होता का?