अपघात टाळण्यासाठी रस्ते, पदपथ दुरूस्तीची कामे हाती घ्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : रस्ते आणि पदपथ दुरूस्तीची कामे तातडीने करून अपघात टाळावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन आज (सोमवारी) केली आहे.पाच दिवसांपूर्वी बुधवारी दि.३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी औंध येथे नागरस रोडवर ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हे ठिकाण नागरस रोड वरील राहुल रेस्टॉरंटच्या समोर असून, तेथील रस्ता आणि साईड पट्टी यांची समान पातळी नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणारे चार चाकी वाहन थांबू शकले नाही आणि ते त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी घटना
आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात नमूद केली आहे. येथील रस्ता दुरुस्ती आमदारांनी तातडीने पालिकेकडून करवून घेतली.

पाच दिवसांपूर्वी बुधवारी दि.३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी औंध येथे नागरस रोडवर ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हे ठिकाण नागरस रोड वरील राहुल रेस्टॉरंटच्या समोर असून, तेथील रस्ता आणि साईड पट्टी यांची समान पातळी नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणारे चार चाकी वाहन थांबू शकले नाही आणि ते त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी घटना आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात नमूद केली आहे. येथील रस्ता दुरुस्ती आमदारांनी तातडीने पालिकेकडून करवून घेतली.

मात्र, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालिका आयुक्तांना आमदार शिरोळे यांनी पत्र पाठविले. त्यात, रस्त्यावरील खड्डे बुजवले जावेत, रस्ता आणि साइड पट्टी याच्यामधील पातळी व्यवस्थित असावी, ज्या रस्त्या़चे रुंदीकरण करायचे आहे आणि ज्याची आखणी झालेली आहे अशा रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे, रस्ते आणि ड्रेनेजची झाकणे ही समांतर पातळीवर करावीत, पदपथ खड्डेमुक्त आणि त्यावरून नागरिकांना व्यवस्थित चालता येईल असे करावेत, प्रत्येक चौकात आसलेल्या पदपथांची वळणे कमी करावीत. पथपथांवरील अतिक्रमणे काढावीत, अशा उपाययोजना आमदार शिरोळे यांनी सुचविल्या आहेत.या खेरीज औंध आणि परिसरासाठीही आमदार शिरोळे यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात औंध मधील वाहतूक नियोजन करण्यासाठी पार्किंग व्यवस्था सुलभ कराव्यात. सिग्नल चालू करावेत. सिग्नलच्या आजूबाजूचे पार्किंग बंद करावे, विद्यापीठ चौक ते ब्रेमेन चौक राजभवन रस्ता हा अतिक्रमण मुक्त करावा, भाले चौक, मेडी पॉईंट चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॉसमॉस बँक चौक, अशा गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची व्यवस्था करावी, असे आमदार शिरोळे यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपल्या पत्रात म्हटले आहे.
भेटी दरम्यान सचिन वाडेकर, अनिल भिसे, उत्तम बहिरट उपस्थित होते.

See also  कळस येथील दवाखान्यात प्रसूती गृह सुरु करावे - “आप” ची मागणी

या खेरीज औंध आणि परिसरासाठीही आमदार शिरोळे यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात औंध मधील वाहतूक नियोजन करण्यासाठी पार्किंग व्यवस्था सुलभ कराव्यात. सिग्नल चालू करावेत. सिग्नलच्या आजूबाजूचे पार्किंग बंद करावे, विद्यापीठ चौक ते ब्रेमेन चौक राजभवन रस्ता हा अतिक्रमण मुक्त करावा, भाले चौक, मेडी पॉईंट चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॉसमॉस बँक चौक, अशा गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची व्यवस्था करावी, असे आमदार शिरोळे यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपल्या पत्रात म्हटले आहे.
भेटी दरम्यान सचिन वाडेकर, अनिल भिसे, उत्तम बहिरट उपस्थित होते.