बाणेर गावठाण परिसरातील ड्रेनेज समस्या संदर्भात जयेश मुरकुटे यांची सहाय्यक आयुक्त गिरीश दापेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी

औंध : बाणेर गावठाण परिसरातील रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाणी ड्रेनेज समस्यांविषयी औंध क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी याविषयी निवेदन दिले.

बाणेर गावठाण परिसरात, कटके वि‌द्यालयाजवळून बाणेश्वर मंदिर व भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबतात. त्यामुळे सांडपाणी व घाण रस्त्यावर ओसंडून वाहते, ज्यामुळे परिसरात अस्वच्छता व आरोग्यविषयक अडचणी निर्माण होत आहेत.

या मार्गावर दररोज तसेच विशेषतः धार्मिक सणांच्या काळात हजारो भाविक बाणेश्वर व भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. परंतु या अस्वच्छ परिस्थितीमुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.

याबाबत तातडीने दखल घेऊन सदर ड्रेनेज लाईन लवकरात लवकर बदलावी, अशा मागणीचे पत्र यावेळी दिले. यावेळी सोबत या परिसरातील नागरिक आणि सहकारी उपस्थित होते.

See also  अविरत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससी मधून सह्यायक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी