अमोल बालवडकर यांनी सुरू केलेल्या ‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियानाचा 50 दिवसाचा महत्त्वपूर्ण टप्प्या पूर्ण; 50 किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

बाणेर : प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सोमेश्वरवाडी मध्ये अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने परिसर स्वच्छतेसाठी ‘मिशन निर्मल’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाने ५० दिवसाचा टप्पा पूर्ण केला असून सुमारे ५० किलोमीटर रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

स्वच्छ परिसर ही जबाबदारी नाही तर ती एक सवय आहे.  स्वच्छतेची सवय लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मिशन निर्मल अभियान बाणेर येथील पॅन कार्ड क्लब रोड परिसरात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

स्वच्छतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेतात सुरू केलेल्या मिशन निर्मल अंतर्गत नागरिक देखील सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यामध्ये बाणेर बालेवाडी महाळुंगे सोमेश्वरवाडी पाषाण लिंक रोड आधी परिसरातील परिसराची स्वच्छता करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आता पाषाण सुतारवाडी सुसरोड परिसरामध्ये निर्मल अभियान अंतर्गत स्वच्छता करण्यात येणार आहे.

या अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी दुकानांसमोर असलेल्या दुकानदारांना या स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देत आपल्या दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले.

अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले मिशन निर्मल अभियान सातत्यपूर्ण 50 दिवस सुरू असल्यामुळे एक स्वच्छतेच्या चळवळीचे करून घेत आहे.

स्वच्छतेची सवय परिसरामध्ये लागण्यासाठी या मिशन निर्मल अभियान मध्ये नागरिकांनी, सोसायट्यांनी तसेच व्यवसायिकांनी देखील पुढाकार घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन देखील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले आहे.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहवानानुसार ‘मिशन निर्मल’ अभियान सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचे कार्य सुरू केले याला 50 दिवस पूर्ण झाले असून परिसरातील शेकडो टन कचरा आत्तापर्यंत स्वच्छ करून 50 किलोमीटर रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय स्वयंशिस्तीतून निर्माण व्हावी यासाठी हे अभियान प्रभागातील सर्व परिसरामध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.

See also  कोथरूड मध्ये "सफाई अपनाओ बिमारी भगाओ" व "स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन - २०२५" अन्वये विविध उपक्रम