पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. अशातच सोशल मीडियावर पुण्यातून एक चेहरा सातत्याने व्हायरल होत आहे. प्रभाग क्रमांक ९ साठी बदल हवा, तर चेहरा नवा या संकल्पनेतून संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड यामुळे लहू बालवडकर यांच्याकडे ‘भाजपाचा नवा चेहरा’ म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही काळात लहू बालवडकर यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये समाविष्ट असलेल्या बाणेर-बालेवाडी-पाषाण- सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस-महाळुंगेया ७ गावांमध्ये १० दिवसांचा गावभेट दौरा केला. आणि त्यांचं हेच पाऊल सध्या महत्त्वाचे ठरत आहे. आमच्याकडे लक्ष दिले जात नाही, लोकप्रतिनिधी येथे फिरकत सुद्धा नाहीत, अशी भावना नागरिकांमध्ये असताना लहू बालवडकर यांनी गावोगावी, घरोघरी जाऊन सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला.यामुळे तरुणांसह नव्या मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. सोबतच पक्षांतर्गत पातळीवरही त्यांच्यावर विश्वास टाकला जात असल्याची चर्चा असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या नव्या चेहऱ्यावर सुद्धा भाजप सध्या लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुण्यात यंदाच्या महापालिका निवडणुकांसाठी भाजप ‘गुजरात पॅटर्न’ राबवणार असल्याची चर्चा आहे. भाजपने आगामी निवडणुकांमध्ये २५ ते ३० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामागे पक्षाची रणनीती बदलून नव्या पिढीचे नेतृत्व आणि स्थानिक पातळीवर काम केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा राजकीय संदेश दिला जात आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपाचा संभाव्य नवा चेहरा म्हणून लहू बालवडकर यांचे नाव चर्चेत येत असून, ‘बदलाची हवा’ या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
























