प्रभाग क्रमांक ९ मधून पुनम विशाल विधाते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

औंध : पुणे महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ – बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार पुनम विशाल विधाते यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधिवत दाखल केला.अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ग्रामदैवत, महापुरुष तसेच थोरामोठ्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. लोकसेवेच्या संकल्पाने आणि सकारात्मक ऊर्जेसह त्यांनी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली.

यावेळी बोलताना पुनम विधाते म्हणाल्या, “तमाम मायबाप जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरत प्रभाग क्रमांक ९ तसेच पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण कटिबद्ध राहीन. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख काम करण्याचा माझा ठाम निर्धार आहे.”

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी दिलेले प्रेम, पाठबळ व सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा संकल्प अधिक बळकट होईल.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून, आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

See also  काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष