काँग्रेस भवन येथे आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज  यांना अभिवादन

पुणे : आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त  त्यांच्या पवित्र स्मृतीस काँग्रेस भवन येथे  विनम्र अभिवादन करण्यात आले.

पुणे जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष  श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.चव्हाण पाटील म्हणाले,गोरगरिबांच्या,बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी,कलेच्या संवर्धनासाठी तसेच सामाजिक अन्यायाविरुद्ध,जातीभेद प्रथेविरुद्ध बहुमुल्य योगदान दिले.

याप्रसंगी उपस्थित पुरंदर तालुका ज्येष्ठ नेते सुनील असुलीकर, पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, पुणे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष शंकरराव दांगट, मिडिया सेल अध्यक्ष सुरेश नांगरे,देवराज यादव, नरेश आवटी, पुणे शहर रिक्षा संघटना अध्यक्ष दिलीप लोळगे, अपंग सेल जिल्हा अध्यक्ष द्यनेश्वर निम्हण, ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष नाना बेडगे आदी उपस्थित होते.

See also  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण