सिल्वर होम येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बाणेर, पुणे : महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधत बाणेर येथील सिल्वर ओल्ड एज होम (वृद्धाश्रम) येथे १ मे रोजी आनंददायी आणि सांस्कृतिक वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या विशेष दिनानिमित्त अस्मिता, श्रम आणि करूणा या मूल्यांचा संगम अनुभवायला मिळाला. चैतन्य गायक कट्टा, बालेवाडी यांच्या सदस्यांनी विविध मराठी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. “इतरांचा आनंद तोच आपला आनंद” या भावनेतून सादर झालेल्या या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमानंतर सिल्वर ओल्ड एज होमच्या प्रदीप्ता ताई कुलकर्णी आणि श्रीमती कमला ताई यांनी चैतन्य गायक कट्ट्याचे अभिनंदन करत आभार मानले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन चैतन्य गायक कट्ट्याचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन नरेश शास्त्री, सौ. आशा शास्त्री आणि हरेष मेहता यांनी केले. तसेच चंदुकाका सराफ यांच्या वतीने प्रतिनिधी श्री. सुरज केंगार यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

See also  ना. चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी