गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास;मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, गणपती दर्शनासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास केला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत चंद्रकांतदादा पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मानाच्या गणपतींच्या दर्शनानंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती तसेच भाऊ रंगारी गणपतीचेही दर्शन घेतले.

गणपती दर्शनासाठी रिक्षाने प्रवास केल्याने त्यांच्या या साध्या आणि आगळ्या प्रवासाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. यावेळी त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

पुण्याच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक गणेशोत्सवाची भव्यता, उत्साह आणि भक्तिभाव अनुभवत चंद्रकांतदादा पाटील यांनी गणरायाकडे राज्याच्या प्रगतीसह नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, अडचणीत सापडलेल्या बळीराजासाठी गणरायाला साकडे घातले.

See also  ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी रमेश बहिरट "बोपोडी भूषण २०२५’’ पुरस्कारने सन्मानित