भामचंद्र डोंगर बचाव वारकरी, शेतकरी संघर्ष समिती एकत्र लढणार!

आळंदी प्रतिनिधी;  श्री क्षेत्र आळंदी येथे गोपाळपुरा हनुमान मंदिर मध्ये संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी श्री क्षेत्र देहू येथील भामचंद्र, भंडारा या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधना भूमीच्या प्रश्नावर भंडारा भामचंद्र परिसरातील शेतकरी बांधव यांची बैठक तुकयाभक्त मधुसूदन पाटील महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे लक्ष्मण वडले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य आध्यात्मिक आघाडीचे ह भ प बालासाहेब मोहिते पाटील बब्रुवान शेंडगे पाटील संतभूमी संरक्षक समितीच्या कार्याध्यक्ष माधवीताई माने भामचंद्र डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष- साखरचंद महाराज लोखेडे तसेच भामचंद्र परिसरातील शेतकरी सर्वश्री कैलास लिंबोरे पाटील, विशाल लिंबोरे, ह.भ.प. रंगनाथ महाराज सोंडेकर,काशिनाथ लिंभोरे,शंकर लिंबोरे, वारकरी शिवाजी , दिलीप डोंगरे ,शिवाजी मोकाशी, ह भ प शंकर महाराज भोपाळ तसेच भामचंद्र डोंगरामधील सर्व शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये श्रीक्षेत्र देहू जवळील संत तुकोबाची साधना तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असणारा भामचंद्र पर्वत अबाधित ठेवण्याच्या प्रश्नावर तुकयाभक्त मधुसूदन पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याबाबत मधुसूदन पाटील महाराज म्हणाले 2007 पासून भामचंद्र मुक्ती लढ्याची ही लढाई आपण लढत आहोत. शेतकरी आणि त्यांचे होणारे नुकसान याची भरपाई शासनाकडून मिळाली पाहिजे यासाठी वेळोवेळी अनेक प्रस्तावातून मागणी केल्याचे सांगीतले. डोंगरही अखंड पवित्र सुरक्षित राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यालाही त्याच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे. यासंबंधी आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले व या बैठकीत झालेल्या निर्णयाचे जिल्हाधिकारी यांना संघर्ष समितीने तातडीचे निवेदन दिले असून या निवेदनामध्ये ज्या शेतकऱ्यांची भामचंद्र डोंगर संरक्षित क्षेत्रात जमीन आहे. त्यांना त्याचा मोबदला म्हणून  सरकारी गायरानातील जमिनीतून जमिनीला जमीन म्हणून द्यावी किंवा MIDC ने संपादीत केलेली उपलब्ध जमीन शेतकऱ्यांना द्यावी.शेतकऱ्यांचाही फायदा व डोंगरही सुरक्षित राहणे ही सांप्रदायासह महाराष्ट्राच्या विविध संस्था संघटनानी केलेली मागणी संविधानिक असून यामध्ये शेतकरी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

See also  औंध मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायम स्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे -रमेश ठोसर

यासाठी स्थानिक वारकरी व शेतकऱ्यांसह भामचंद्र- भंडारा मुक्ती संघर्षाला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील विविध चळवळी संघटना व संस्थांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे असे आवाहन मधुसूदन महाराजांनी यावेळी केले . शिवसेना नेते व शेतकरी संघटनेचे प्रमुख लक्ष्मण वडले साहेब यांनी ही लढाई केवळ भामचंद्र साधना भूमीची नसून शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांची जमीन मिळवून देण्यासाठीची सुद्धा आहे महाराष्ट्रात शेतकरी हाच वारकरी आणि वारकरी हाच शेतकरी हे आपण कधीही विसरणार नाही. त्यासाठी शेतकरी संघटना, मराठा महासंघ या न्याय्य मागणीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असे सांगून या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या यापुढे भामचंद्र डोंगर अखेड व पवित्र राखण्यासाठी मधुसूदन महाराजांच्या बरोबर आम्ही राहू याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी आम्ही सर्वजण तुकया भक्त मधुसूदन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले.बीड जिल्हा मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे श्री प्राध्यापक शिवराम सोंडगे यांनी या शेतकरी बैठकीला मार्गदर्शन केले शेवटी माधवीताईनी भंडारा भामचंद्र मुक्ती संघर्षाच्या विधायक कार्यासाठी वारकरी आणि शेतकरी एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करून सर्वांचे मानून कार्यक्रमाची सांगता झाली .