एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमधील वाद आता विकोपाला पोहचला आहे. आज शासन आपल्या दारी असलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून जाण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका जाहिरातीमुळे घोळ केला असा सुर आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पालघर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून पालघर येथे पोहचले. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यास फडणवीसांनी एकाच गाडीत जाण्यास नकार दिल्याने एकाच चर्चा आता होऊ लागली आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांपेक्षा वरचढ ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार टिका टिप्पणी करण्यात आली. याचे पडसाद कोल्हापुर येथे झालेल्या कार्यक्रमात देखील दिसले. कोल्हापुर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात फडणवीसांनी गैरहजेरी लावली.

See also  भाजपच्या पहिल्या यादीत 'कसबा' नाही आश्चर्याचा धक्का