प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान

पुणे : प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजचे प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. मनोज गायकवाड यांनी “पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जागतिकीकरणाच्या दृष्टीने व्यष्टी अध्ययन” या विषयावर शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातून संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. नवनाथ तुपे यांचे मार्गदर्शन लाभले. मनोज गायकवाड यांनी पीएच. डी. प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

See also  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू होणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील