प्रियदर्शिनी वुमेन्स फोरम व बिटीया फौंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन

पुणे : प्रियदर्शिनी वुमेन्स फोरम व बिटीया फौंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वलाखे आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सूर्यदत्ता ग्रुपचे डॉ संजय चोरडिया, मराठी चित्रतारका स्मिता गोंदकर, संगीता तिवारी,आरती शिंदे, मॉडेल प्रोड्यूसर राहुल जगताप, ऍड. अभय छाजेड, बाळासाहेब दांडेकर, रफिक शेख , पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, भानुप्रताप बर्गे , लता राजगुरू, वैशाली मराठे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात चैत्राली विश्वास शर्मा हिने गणेश वंदना सादर केली.त्यानंतर गौतमी कुमार अहिर हिने मी मी सावित्री बोलतेय हे एकपात्री नाट्य सादर केले. वाती ते मूर्ती सर्व एकाच छताखाली १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत चालू रहाणार असून १६ तारखेला पूर्ण रात्रभर ही जत्रा चालू रहाणार आहे. इथे सायंकाळी रोज एक कार्यक्रम चालू रहाणार आहे. दिं. ११ ते १६ तारखेपर्यंत रोज सायंकाळी श्रावण फॅशन क्लीन शो, नऊवारी फॅशन वॉक, बॉलिवूड साॅंग्ज, , बॉलिवूड रेट्रो थीम , महिलांसाठी तंबोरा आणि बरेच कार्यक्रम असणार आहेत.यावेळी खास करून आय‌ टी. मधील लोकांसाठी दिं. १६ रोजी मिडनाईट मार्केट प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली.सर्व मान्यवरांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

See also  विधाते वस्ती बाणेर येथील मनोज दळवी यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश