औंध येथे गणेश मूर्ती विसर्जन फिरत्या हौदाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन

औंध : औंध परिसरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी सचिन मानवतकर यांच्यावतीने नागरिकांसाठी फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते विसर्जन हौदाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, रविंद्र साळेगावकर, गणेश बगाडे, सचिन मानवतकर, अजय दुधाणे,सचिन वाडेकर,सुरज गायकवाड़, मनोज ठोसर, अक्षय घडसिंग, रामभाऊ मंडलीक, प्रकाश सोलंकी आदी उपस्थित होते. विसर्जन हौद साठी संपर्क नं – 9665355335

नागरिकांना पर्यावरण पूरक विसर्जन करता यावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून फोन केल्यानंतर विसर्जन हौदाची व्यवस्था करणार असल्याचे सचिन मानवतकर यांनी सांगितले.

See also  पाषाण सुतारवाडी सुस रोड परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राहुल कोकाटे यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक