बाणेर पाषाण लिंक रोड येथील ‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटीमध्ये आदर्श शिक्षकांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

पाषाण : बाणेर पाषाण लिंक रोड, पुणे येथील ‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी मध्ये गेले १० दिवस ‘श्री गणेशोत्सव’ अत्यंत आनंदी उत्साहात आणि भक्तिमय साजरा करण्यात आला, यामध्ये सोसायटीतील सर्व गटातील मुले तसेच जेष्ठ सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

श्री गणेशोत्सवामध्ये सुंदर सजावट, विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच नृत्य व गायन या कला अविष्कारांचा समावेश होता. काल विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या व जिंकलेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते जल्लोषात पार पाडण्यात आला, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मिडीयम हायस्कुल सोलापूर या संस्थेचे प्राचार्य श्री प्रेमचंद भाऊचंद आग्रे , तसेच पुणे मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री.उत्तमराव आनंदराव कदम हे लाभले होते.दोन्ही मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण समारंभ जल्लोषात पार पडला.

यावेळी मान्यवर आणि प्रमुख पाहुणे माननीय श्री आग्रे सरांनी मुले व सभासदांना मार्गदर्शन केले. क्रीडा मैदाने व खेळांच्या स्पर्धेमुळे लहान मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायट्यांमध्ये होणार्‍या विविध क्रीडा स्पर्धा कौतुकास्पदच आहेत.
तसेच आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात मुलांनी पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे पुढील पिढीसाठी तेच आदर्श ठरणार आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

माननीय श्री कदम गुरुजी यांनी श्री गणेशोत्सवात सोसायटीमध्ये विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच नृत्य व गायन या कला स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल सभासद आणि आयोजकांचे विशेष कौतुक केले. तसेच अश्या प्रकारचे कार्यक्रम साजरे होण्याने सोसायटीमध्ये उत्साह, आनंदी आणि भक्तीमय वातावरण तयार होते तसेच सोसायटी जपत असलेल्या संस्कृतीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.दोन्ही मान्यवरांचे हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.या बक्षीस वितरण कार्यक्रमास सोसायटीतील ज्येष्ठ सभासद, महिला सभासद आणि सर्व विजेते स्पर्धक आणि स्पर्धेत सहभाग घेतलेले स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

See also  चांगल्या कामाची पावती समाजातून मिळत असते - सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पुष्कर कुलकर्णी यांनी तर प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे आभार श्री रामदास कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ प्रज्ञा कळसकर यांनी केले.