मराठवाडाभूषण व मराठवाडारत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान

मुंबई : मराठवाडामुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त गडकरी रंगायतन, ठाणे येथे मराठवाडाभूषण व मराठवाडारत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर आदी उपस्थित होते.

मराठवाडामुक्तिसंग्राम हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन करुन हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यावेळी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना मराठवाडाभूषण तर, कैलास जाधव, सोनाली मात्रे (प्रशासकीय), सोमनाथ वाळके (शैक्षणिक), कर्ण एकनाथ तांबे, आत्माराम सोनवणे (सामाजिक), मिलिंद शिंदे (कला) यांना मराठवाडारत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

See also  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन:नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील-पालकमंत्री