पुणे : वाहतुकीला रस्ता असणारे जगातील सर्वात उंच शिखर खरदूंग ला (लेह -लडाख) इथून पुणे परिसरातील १२ मावळातील श्री.विनायक दारवटकर, श्री.किरण शेळके, श्री.हनुमंत जांभुळकर, श्री.विशाल डुंबरे, श्री.संदीप गोडांबे, श्री.दत्ता म्हाळसकर आणि सहकारी या जिगरबाज मावळ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पुजन उणे -3.7’C तापमानामध्ये करुन, ध्येयमंत्र व शिवावंदना घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सायकल मोहीमेला सुरुवात केली.मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी.. हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दणानून सोडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० श्रीशिवराजाभिषेक दिन निमित्त
लेह ते कन्याकुमारी सायकल यात्रा मोहिम सुरू करण्यात आली आहे. यावेळी या युवकांनी मावळ्यांचे वेश परिधान केला होता. तसेच भारताचा राष्ट्रध्वज व स्वराज्याचा भगवा ध्वज यावेळी फडकवण्यात आला.