पुणे युवक क्रीडा सेल उपाध्यक्षपदी लतेंद्र भिंगारे तर मीडिया समन्वयक पदी सौरभ सोनी यांची नियुक्ती

पुणे : कॉंग्रेस भवन येथे युवक व क्रीडा सेलचे प्रदेशाध्यक्षा समीता गोरे आणि पुणे युवक व क्रीडा सेलचे शहराध्यक्ष आशुतोष शिंदे यांच्या मान्यतेने लतेंद्र जनार्दन भिंगारे यांची पुणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी,तसेच सौरभ सोनी ह्यांची सोशल मीडिया समन्वयक पदी निवड करण्यात आली.या वेळी नियुक्तीचे पत्र पुणे काँग्रेस शहराध्यक्ष श्री अरविंद शिंदे आणि माजी अध्यक्ष श्री अभाय छाजेड यांच्या हस्ते देण्यात आले.

युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ ,nsui अध्यक्ष अभिजीत गोरे , इंटक अध्यक्ष बळीराम डोळे, माजी नगरसेवक मुखतरभाई शेख, महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष संगीताताई तिवारी, माजी महापौर कमलाताई व्यवहारे, लताताई राजगुरू व इतर मान्यवर हे उपस्थित होते.

See also  जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा मुळशी येथे संपन्न: प्रथम क्रमांक मोरया कबड्डी संघ लवळे, द्वितीय क्रमांक भैरवनाथ संस्था संघ भोसरीने पटकाविला