पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध

पुणे : पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,ॲड.असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार यांच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला.


पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली होती. यावेळी या हल्ल्यात महिला व कार्यकर्त्यांना देखील झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, या बीभत्स व हिंस्र वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज रणरागिनी झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक,पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली!