बालेवाडी हाय स्ट्रीट २ चे उद्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

“बालेवाडी हायस्ट्रिट २” बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्याचा “उद्घाटन समारंभ” उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या रस्त्याचे उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी ममता चौक बालेवाडी येथे सकाळी ८.३० वा आयोजित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे बाणेर बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार असून बाणेर बालेवाडी परिसरातून हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांची देखील सोय होणार आहे.

See also  माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालेवाडी येथील हायस्ट्रीट -२चे उद्घाटन