वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या वतीने कडुलिंबाचे वृक्षारोपण करून गुढीपाडवा साजरा

बाणेर :  येथील वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेने गुढीपाडव्यानिमित्त कडुलिंबाचे वृक्षारोपण करून गुढीपाडवा सन साजरा करण्यात आला.


वसुंधरा अभियान संस्थे मार्फत तुकाई  टेकडीवर 2006 पासून वृक्ष संवर्धन वृक्षारोपणाचे काम चालू असून आत्तापर्यंत संस्थेने 45 हजार पेक्षा जास्त देशी झाडांची लागवड केली आहे .
महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन संस्थेचा सन्मान देखील केला आहे.
संस्थेमार्फत अविरतपणे दररोज लोकसहभागातून जैवविविधता तयार करण्याचे काम चालू असून, संस्थेचे सदस्य दररोज दोन ते तीन तास हरित संवर्धनाचे काम करतात ,त्यामुळे आज टेकडीवर सुंदर अशी जैवविविधता तयार झाली आहे ‌


गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे झाडाची तोड करून झाडाचा विध्वंस केला जातो, आज कडुलिंबाचे झाड लावून ,संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती