कात्रज येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य पुस्तक प्रदर्शनाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन

कात्रज : कात्रज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक वसंत मोरे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कुमार इंदोरे, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, दिलीप जगताप पांडुरंग मरगजे, महेश कदम, राजेंद्र लाटमे, नितीन जगताप, जयंत गिरी, मच्छिंद्र खोमणे,मंगेश रासकर, गणेश काळे , भगवान कोंढाळकर, सोमनाथ पालवे आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठपत्रकार उत्तम कुमार इंदोरे म्हणाले, तरुण पिढीने छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेली पुस्तके व त्यांना अनेक भाषा अवगत होत्या अशा प्रकारचे ज्ञान तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे. तसेच हा देश माझा आहे व या देशातील सार्वजनिक संपदा ही माझी आहे या भावनेतून त्याची जपवणूक व जोपासना झाली पाहिजे.

यावेळी माझे नगरसेवक वसंत मोरे व पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. पुस्तक प्रदर्शनामध्ये 50 हून अधिक प्रकाशनांची 15000 अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महेश खेडेकर, रुपेश मोरे, प्रतीक कोडीतकर यांनी केले होते.

See also  भाजपाचे माजी शहर चिटणीस ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश