धनकवडी : धनकवडी नवीन हद्द सर्वे नंबर 22 सर्वे नंबर तीन आंबेगाव खुर्द नवीन हद्द सर्वे नंबर 41 साई मंदिर परिसरा मागे 2 गल्ल्या येथील आर.आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकामांवर कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्र. 02 विभागामार्फत कारवाई करण्यात आली.
कारवाई च्या अनुषंगाने पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल च्या मदतीने कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण 13,500 चौरस फूट आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
ही कारवाई महापालिकेचे अधीक्षक अभियंता व बांधकाम विभाग झोन क्र. 02 च्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचे उपस्थितीत करण्यात आली
यात 1 जेसीबी, एक गॅस कटर, 7 अतिक्रमण कर्मचारी अशी यंत्रणा वापरण्यात आली.
























