पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडी पुणे शहरा च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पुणे : पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडी पुणे शहरा च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. प्रमुख उपस्थिती पुणे महानगरपालिका निवडणूक निरीक्षक बाबासाहेब कांबळे, जेष्ठ नेते वसंत दादा साळवे, शहराध्यक्ष मुनव्वर भाई कुरेशी, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महासचिव सारिका फडतरे, ऊषा भिंगारे,उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, झाकिर शेख, दिपक शिकोत्रे , महासचिव अरविंद तायडे, सुनील धेंडे, संघटक सतीश रणवरे, रोकडे, रफिक शेख, सचिव बी.पी.सावळे, प्रसिध्दी प्रमुख निरंजन कांबळे, नवनीत आहिरे, संदिप चौधरी, कोथरूड विधानसभा अध्यक्ष दिपक कांबळे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, हडपसर विधानसभा अध्यक्ष बाळू हजारे, उपाध्यक्ष जीवन गाडे, शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष महेंद्र यरल्लू उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . भारिप बहुजन महासंघ तील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला , भीम गीत ऑर्केस्ट्रा , पाणी लाडू वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रस्तावना महासचिव अरविंद तायडे यांनी केली व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील यांनी केले.

See also  पुणे जिल्हा आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत औंधगाव कुस्ती केंद्राचे आरुष, शौर्य धीरज व आदित्य यांना पदक