‘आरटीओ’त एजंट व एजन्सीला परवानगी नाही तरी पुणे महानगरपालिकाचे वाहन पासिंगसाठी एजन्सी नेमणूकीचे दीड कोटीचे टेंडर

पुणे : पुणे महानगरपालिकेने महापालिकेच्या वाहनांचे
पासिंग करण्यासाठी आरटीओ च्या कामासाठी एका
एजन्सीची नेमणूक करण्याचे दीड कोटी रुपयाचे टेंडर
काढले आहे. आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना
परवानगी नाही. तसेच आरटीओ या शासकीय
कार्यालयात समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही
त्यामूळे हे टेंडर तातडीने रद्द करावे अशी मागणी माजी
विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत
बधे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


उज्वल केसकर म्हणाले, आयुक्त हे आय ए एस अधिकारी
आहेत. त्यामूळे त्यांना माहिती असेल की, आरटीओ मध्ये
एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही. मग दीड कोटी
रुपयाचे हे टेंडर कशासाठी काढले याचा खुलासा त्यांनी
खातेप्रमुखांना विचारला पाहिजे. पुणे मनपा ही एक अर्ध
शासकीय संस्था तर आरटीओ ही पूर्ण शासकीय संस्था आहे
यामध्ये समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही त्यामुळे हे टेंडर
तातडीने रद्द करावे ही विनंती अन्यथा आम्हाला यासाठी
माननीय लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल करावी
लागेल. असा इशाराही केसकर यांनी दिला आहे.

See also  मॉडर्न विधी महाविद्यालयात ३ रा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय विधी रंग कार्यक्रम साजरा